🏛️ पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! PDCC बँकेत लिपिक पदांसाठी ४३४ जागांची भरती जाहीर
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक (Clerk) या पदांसाठी एकूण 434 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसंबंधीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवी (Post-Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समकक्ष संगणकक्षेत्रातील प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मराठी भाषेचे (लिखाण, बोलणे, वाचणे) ज्ञान असणे आवश्यक आहे.
🎂 वयोमर्यादा (Age Limit)
किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 डिसेंबर 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 20 डिसेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांद्वारे गुणवत्ता यादीनुसार केली जाईल:
ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Test)
मुलाखत (Interview)
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
💸 अर्ज शुल्क (Application Fee)
सामान्य प्रवर्ग (Open / General Category): ₹ 885 /-
मागासवर्गीय उमेदवार (SC / ST / OBC / NT / SBC इ.): ₹ 531 /-
जाहिरात डाऊनलोड करा
Read More: LDCCB भरती 2025: लातूर जिल्हा बँकेत 375 जागा! क्लार्क/शिपाई ते व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!
मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Please Like, Comment & Share