अन्न भेसळ परवाना

Admin
1

अन्न भेसळ परवाना

ज्‍या ज्‍या ठिकाणी खाद्य पदार्थ विकले जातात किंवा तयार केले जातात त्‍या सर्वांना अन्न भेसळ लायसन्‍सची आवश्‍यकता असते. उदा. हॉटेल बेकरी व इतर सर्व व्‍यावसायिक, फूड व्यवसाय हा चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु करणे सोपे असते. परंतु त्याची प्रत्यक्ष रितसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. त्यानुसार व्यवसायिक लोकांना हॉटेल, किंवा खानावळ इतर आवश्यक खाद्यपदार्थ निर्मितीचा व्यवसाय करावयाचा असेल त्यास शासन मान्यताप्राप्त अन्न भेसळ परवाना आवश्यक आहे. सदर परवान्याच्या नियम व अटीच्या अधीन राहून त्यास फूड किंवा अन्नपदार्थ निर्मितीचा व्यवसाय करता येतो. एखाद्या व्यवसायिकाने नमूद कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास त्यास कायदेशीर कार्यवाही सामोरे जावे लागते. म्हणून हॉटेल व्यवसायिकांसाठी अन्न भेसळ परवाना अत्यंत महत्त्वाचा आहे.

नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?

FSSAI- भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.

परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे/ माहिती

  • आधार कार्ड /पॅनकार्ड
  • उमेदवाराची सही
  • दोन पासपोर्ट कलर फोटो
  • लाईट बील
  • शॉपचा संपूर्ण पत्ता
  • ई-मेल आयडी/मोबाईल नंबर
  • अँगल कॅमेरा App ने दुकानाचा फोटो

अन्न भेसळ परवान्याचा कालावधी :

ऑनलाईन फार्म भरल्यानंतर किमान १ दिवसाचा कालावधी परवान्यासाठी लागतो.

अन्न भेसळ परवान्याची प्रक्रिया :

सदर फार्म हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संकेतस्थळावर भरावयाचा आहे. सदर फार्म भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ऑनलाईनच अन्न भेसळ परवाना आपल्या डॅशबोर्ड प्राप्त होतो. 

संकेतस्थळ : https://fssailicenseonline.com

Online Form भरण्यासाठी संपर्क

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gat No.2, Latur-413512.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!