महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन
विभागाकडून मोठी संधी ! महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना
आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पशुधनात वाढ
करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या पशुसंवर्धन नावीन्यपूर्ण योजनेसाठी
सन 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
गाय-म्हैस दुधाळ गट वाटप, शेळी-मेंढी
पालन गट वाटप व 1000 पोल्ट्री पक्षी (कुक्कुटपालन) युनिट स्थापना इ. असून या योजनेचा लाभ अनुसूचित जाती (अनु.जाती), अनुसूचित जमाती (अनु.जमाती) तसेच इतर मागास प्रवर्ग (इतर प्रवर्गातील) आणि
खुल्या प्रवर्गातील इच्छूक लाभार्थी व शेतकरी कुटुंबातील व्यक्ती घेऊ शकतात.
अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णत:
ऑनलाईन आहे. विहित मुदतीत अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्जदाराने योजनेचा अर्ज भरण्याचा
दि.03.05.2025 ते 02.06.2025
पर्यंत राहील, अंतिम
तारीख 2 जून 2025 पर्यंत असणार आहे.
प्रमुख नावीन्यपूर्ण योजना
1)
दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे. (संकरित गाय व देशी गाय)
2)
अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या /
मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.
3)
1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन
व्यवसाय सुरु करणे.
4)
10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे
अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.
5)
दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा
लाभार्थींना वाटप करणे.
6)
8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.
7)
एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे.
लाभार्थी निवडीचे निकष -
प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)
वरील सर्व योजनेसाठी लाभार्थी निवडीचे
निकष हे खालील प्रमाणे राहतील.
·
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
·
अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
·
अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
·
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद
असलेले)
·
महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं
१ ते ३ मधील)
अर्जासोबत आवश्यक जोडावयाची
कागदपत्रे –
·
* फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
·
* सातबारा (अनिवार्य)
·
* ८ अ उतारा (अनिवार्य)
·
* अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
·
* आधारकार्ड (अनिवार्य )
·
* ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे
तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
·
* अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
(असल्यास अनिवार्य)
·
या व्यतिरिक्त इतर अनुषंगिक लागू असलेले कागदपत्रे असल्यास अर्जात
नमूद करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, रोडे
कॉम्पलेक्स, शॉप नं. 5,
नेताजी नगर, लातूर
प्रो.प्रा. किशोर ससाणे Mob. 9689644390 www.pdslatur.in
इच्छूक आणि पात्र लाभार्थ्यांनी
विहित मुदतीत म्हणजेच दिनांक ०२ जून २०२५ पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर
करणे अनिवार्य आहे. या संधीचा लाभ घेऊन पशुसंवर्धन व्यवसायात प्रगती साधावी, असे आवाहन पशुसंवर्धन
विभागामार्फत करण्यात आले आहे.
टीप: कृपया अधिकृत
संकेतस्थळावर जाऊन योजनेचे सविस्तर नियम, अटी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्यावी.
Please Like, Comment & Share