RTE Online Form 2024-25, पालकांकरिता सूचना अनिवार्य

Admin
0

 

RTE Online Form 2024-25, पालकांकरिता सूचना अनिवार्य


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष 2024-2025 घेण्याकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर RTE फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन असणार आहे. त्यासंबंधी सूचना ह्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार RTE Online Form 2024-25 भरण्यासंबंधी पालकांकरिता काही सूचना अनिवार्य केलेल्या आहेत. त्याबाबत खालील प्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

1)  RTE प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

2) पालकांनी अर्ज भरताना त्यांच्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा-पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक (Date of Birth) अचूक लिहावा.

4) 1 कि.मी, 1 ते 3 कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 च शाळा निवडाव्यात.

5) सदर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द (Cancel) होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) सदर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट (Delete) करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट (Duplicate) अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी (Lottery) प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  सदर अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) सदर अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) सदर अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट (Reset) करावा.

11) RTE 25 % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग (Disability) बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे.

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून Bank Passbook दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) सदर अर्ज भरताना Location चुकू नये म्हणून Google वर पत्ता टाकून ते Lattitude, longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास Location चुकणार नाही.

16) जर तुम्हाला 1 कि.मी. च्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हास Self Finanace school सिलेक्शन साठी उपलब्ध नसेल व Self Finanace school not available असा मेसेज दिसेल.

वरील प्रमाणे सूचना अधिकृत संकेतस्थळाचा आधार घेऊन सुलभ भाषेत देण्यात आलेल्या आहेत. पालकांनी त्यांचे RTE Online Form 2024-25 प्रवेश अर्ज करतांना काळजीपूर्वक भरावयाचा आहे. एकदा फॉर्म भरल्यास त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची संबंधीत पालकांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जुलै 2024

RTE प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे (Click here download)

पालकांचे हमीपत्र Pdf (Click here download)

पालकांना सूचना Pdf (Click here download)

RTE Online Form 2024-25, वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अधिकृत संकेतस्थळ

RTE ऑनलाईन अर्ज भरा

हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत शेअर करा व सब्स्क्राईब करून सहकार्य करावे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!