जिल्हा न्यायालय अंतर्गत विविध पदांची मेगाभरती-२०२३

Admin
0

जिल्हा न्यायालय अंतर्गत विविध पदांची मेगाभरती-२०२३


महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांच्या जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना उक्त पदांसाठी अर्ज दि. ४ डिसेंबर २०२३ ते १८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

न्यायालयीन पदनिहाय जागेचा तपशील

अ. क्र.

तपशील

लघुलेखक

(श्रेणी-3)

कनिष्ठ लिपिक

शिपाई/ हमाल

1

निवड यादी

568

2795

1266

2

 

प्रतिक्षा यादी *

146

700

318

3

 

वेतनश्रेणी

वेतन स्तर एस-14:

(38600-122800)

वेतन स्तर एस-6 : (19900-63200)

वेतन स्तर एस-1:

(15000-47600)


वयाची पात्रता कशी आहे?

अ) शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. Free Age Calculate

आ) योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य / केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

(ii) उमेदवारास 28.03.2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

(iii) जर उमेदवारास नैतिक अध:पतनाचा समावेश असलेल्या गुन्हयासाठी शिक्षा | झाली असेल किंवा त्याला/तिला उच्च न्यायालय / जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरविले असेल तर तो / ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.

टीप:

1.दिव्यांग व्यक्तिंकरीता आरक्षणासाठी दाखल केलेल्या रिट याचिका (एल) क्र. 1137/2018 सह जनहित याचिका क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार अपंग व्यक्तिंसाठी 4% पदे राखीव ठेवली आहेत. दिव्यांग व्यक्तिंसाठीची पदे, या पदांसाठी दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर, अधिसूचित केल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तिंसाठीची पदे उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार नजीकच्या भविष्यात भरली जातील. जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतिक्षा यादी परिशिष्ट - "अ" येथे दिली आहे. उमेदवारांनी सामान्य सूचना आणि इतर तपशील (यापुढे नमूद केलेले) काळजीपूर्वक वाचावे आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी त्याचे पालन करावे.

2. उच्च न्यायालयाच्या दिनांक 19.08.2023 च्या अधिसूचनेनुसार प्रतिक्षा यादी.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता कशी आहे?

a) लघुलेखक (श्रेणी-3)

पात्र होण्यासाठी उमेदवाराने

(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)

(आ) त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

(इ) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये - इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन | 80 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि

- इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे.

(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M. S. Office, M.S. Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती. ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.

iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.

iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.

कनिष्ठ लिपिक

(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)

(आ) त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

(इ) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) - यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.

(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S. Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.

ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.

iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.

iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.

शिपाई/ हमाल

उमेदवाराने किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क :

सर्वसाधारण प्रवर्गासाठी - 1,000/-

शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 900/-

टीप : भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते दिनांक १८ डिसेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा


ऑनलाईन अर्ज करा


अधिकृत वेबसाईट


अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

Read More

State Bank India (SBI); अंतर्गत अधिकारी पदांची नवीन भरती


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!