पदांचा तपशील आणि रिक्त जागा
या भरती प्रक्रियेतून एकूण ५ प्रकारची पदे दोन वर्षांच्या कालावधीसाठी भरली जाणार आहेत:
| पदनाम | एकूण जागा |
| लिपिक (Clerk) | १३३२ |
| शिपाई (Peon) | ८८७ |
| लघुलेखक (निम्नश्रेणी) | ५६ |
| लघुलेखक (उच्चश्रेणी) | १९ |
| वाहनचालक (Driver) | ३७ |
पात्रतेचे निकष काय आहेत?
१. लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग (४० श.प्र.मि.) + MS-CIT. (कायद्याची पदवी असणाऱ्यांना विशेष प्राधान्य).
२. शिपाई: किमान ७ वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.
३. चालक: १० वी उत्तीर्ण + ३ वर्षांचा अनुभव + वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
४. लघुलेखक (निम्नश्रेणी): पदवी + ८० श.प्र.मि. स्टेनो + ४० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग.
५. लघुलेखक (उच्चश्रेणी): पदवी + १०० श.प्र.मि. स्टेनो + ४० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग.
Read More: Bombay High court Recruitment 2025, मुंबई उच्च न्यायालय मेगाभरती
वयोमर्यादा (८ डिसेंबर २०२५ रोजी)
लिपिक व शिपाई: १८ ते ३८ वर्षे.
लघुलेखक व चालक: २१ ते ३८ वर्षे.
(मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत लागू राहील.)
महत्त्वाच्या बाबी
अर्ज शुल्क: सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी (खुला, OBC, SC/ST, EWS, दिव्यांग व महिला) १०००/- रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर.
अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाईन माध्यमातून.
लक्षात ठेवा: अर्जाची नवीन अंतिम तारीख १६ जानेवारी २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचण टाळण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Please Like, Comment & Share