राज्य पोलीस भरती 2024, अर्ज करतांना ह्या बाबींकडे द्या लक्ष

Admin
0

 

राज्य पोलीस भरती 2024, अर्ज करतांना ह्या बाबींकडे द्या लक्ष


महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ अंतर्गत पोर्टलवर विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. अनेक उमदेवार त्यांच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करीत आहेत. नवीन नोंदणी करतांना उमेदवारांना व संगणक चालकांना अनेक अडचणी व समस्या निर्माण होत आहेत. याविषयी अधिकृत संकेतस्थळाचा आधार घेऊन माहिती देण्यात येत आहेत. 

पोलीस भरती-२०२४, अर्ज करण्यापूर्वी या बाबींकडे लक्ष द्या

1) कृपया अर्जदारांनी नोंदणी करतांना आपला वैध तसेच सध्यस्थितीत कार्यरत असलेला आणि आपण वापरत असलेला ईमेल आय. डी. आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा.

2) नोंदणी प्रक्रिये दरम्यान यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3) अर्जदारांनी एका पदाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज करु नयेत याचे पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे.

4) त्यामुळे उमेदवारांनी माहिती भरताना उचित दक्षता बाळगावी.

वरील सूचना अद्यावत असून अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेल्या आहेत.

नोंदणी करतांना वारंवार येणाऱ्या अडचणी व उपाय

ई-मेल OTP येत नाही ?

नोंदणी करतांना उमेदवाराने अचूक ईमेल आयडी प्रविष्ठ करावा. चुकीचा व कॅपिटल टाकल्यास नोंदणी होत नाही. चुकीच्या ईमेलवर कन्फर्मेशन लिंक जाऊ शकते. यामुळे तुम्हांला जोपर्यंत ईमेल कन्फर्मेशन  होत नाही तोपर्यंत अर्ज करता येत नाही. यामुळे आपण ईमेल आयडी अद्यावत चालू देणे बंधनकारक आहे.

अर्ज नोंदणी यशस्वी पूर्ण होत नाही ?

एखाद्या उमेदवाराने ईमेल, मोबाईल व आधार टाकून चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्यास किंवा ईमेल कन्फर्मेशन यशस्वी पूर्ण न झाल्यास तुम्हांला पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. याविषयी सविस्तर अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

पासवर्ड विसरल्यास Forgot न होणे  ?

नोंदणी करतांना योग्य व अचूक ईमेल आयडी व मोबाईल देणे अत्यंत गरजेचे आहे. आपण जर ईमेल व मोबाईल चुकीचा दिल्यास नोंदणी होईल व पासवर्ड Forgot होणार नाही याची नोंद घ्यावी. यामुळे अचूक पासवर्ड नोंदणी वेळी देण्यात यावा. उदा. Lat@2024

युजरनेम विसरल्यास Forgot न होणे  ?

नोंदणी करतांना योग्य व अचूक ई-मेल आयडी व मोबाईल देणे अत्यंत गरजेचे आहे. अर्ज करतांना तुमचा ईमेल आयडी हा युजरनेम असतो. आपण जर ईमेल चुकीचा दिल्यास नोंदणी होईल पण युजरनेम Forgot करता येणार नाही याची नोंद घ्यावी. यामुळे अचूक युजरनेम नोंदणी वेळी देण्यात यावा. उदा. [email protected]

आधार नंबर एकदा नोंदणीकृत झाल्यास नोंदणी होते का ?

नाही, जर आपण एक ईमेल एका अर्जास वापरल्यास दुसऱ्यांदा नोंदणी तुम्हांला करता येणार नाही.

एखादा नोदंणी केल्यास किती अर्ज करता येतील.

आपण जर एका ईमेल, एका मोबाईल व आधार नंबर ने नोंदणी केल्यास आपल्या फक्त एकच पदासाठी अर्ज करता येईल. उदा. पोलीस शिपाई, ड्रायव्हर म्हणजेच एका एका पदांसाठी व एका विभागात एकदाच अर्ज करता येईल. एकाच पदांसाठी वेगवेगळ्या विभागात अर्ज करता येणार नाही.

पोलीस भरती नोंदणी, शुल्काबाबत विवरण

1) अर्ज सुरु होण्याची तारीख

05-03-2024 00.00 वा.

2) अर्ज बंद होण्याची तारीख

31-03-2024 24.00 वा.

3) ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख

31-03-2024 24.00 वा.

Police General सूचना डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसे, नेताजी नगर, लातूर, महाराष्ट्र-४१३५१२

श्री. किशोर ससाणे, मो.नं. ९६८९६४४३९०, ०२३८२-२२२२९०

 

Police Bharti 2024, शिपाई पदांसाठी online अर्ज करा

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!