राज्य महावितरण कंपनी मेगाभरती-२०२३, विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा

Admin
0

 

राज्य महावितरण कंपनी मेगाभरती-२०२३, विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा

महावितरण कंपनी कडून दि. २९/१२/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या (०६/२०२३) जाहिरातीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट-४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल असे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ जागा

शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी/ तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) व्यवसाय  पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCVT) यांनी विजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिक सेक्टर) प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय २९ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस.)/ खेळाडू/ अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष सवलत आहे.)

विनामूल्‍य वय मोजा- Free Age Calculate

शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार १२५/- रुपये

      दोन्ही चलनास जी.एस.टी. वेगळा राहील.

अर्ज करण्‍याची अंतिम तारीख- 20 मार्च 2024 पर्यंत आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात डाऊनलोड


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!