लातूर महानगरपालिका भरती-२०२३, नोकरीची उत्तम संधी

Admin
0

लातूर महानगरपालिका भरती-२०२३, नोकरीची उत्तम संधी
लातूर महानगरपालिका भरती 2023: लातूर महानगरपालिकेने दि. 22 डिसेंबर 2023 रोजी श्रेणी-अ ते श्रेणी-क मधील विविध 17 संवर्गातील 80 रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. दहावी उत्तीर्ण किंवा पदवी किंवा औद्येगिक प्रशिक्षण संस्थेतील मान्यताप्राप्त डिप्लोमा व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. सदर जागा ह्या प्रशासकीय तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. 

Latur Municipal Corporation Recruitment-2023

लातूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त पदे 

लातूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 80 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात लातूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील पदांचे नाव व एकूण रिक्त पदसंख्या पुढील प्रमाणे:

 1. पर्यावरण संवर्धन अधिकारी- 01
 2. सिस्टिम मॅनेजर ई प्रशासन- 01
 3. वैद्यकीय अधीक्षक-01
 4. विधी अधिकारी  -01
 5. अग्निशमन केंद्र अधिकारी-01
 6. शाखा अभियंता (स्थापत्य)- 02
 7. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 04
 8. कनिष्ठ अभियंता (पा.पु.) -04
 9. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01
 10. कर अधीक्षक- 02
 11. औषध निर्माता (फार्मासिस्ट)- 01
 12. सहाय्यक कर अधीक्षक-04
 13. कर निरीक्षक-04
 14. चालक - यंत्रचालक-09
 15. लिपिक टंकलेखक-10
 16. फायरमन-30
 17. व्हालमन- 04

प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क :

 • आरक्षण प्रवर्गास - 900/-
 • सर्वसाधारण प्रवर्गास - 1000/-

टीप : भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

Read More राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र 2023 जाहीर

पदांची शैक्षणिक पात्रता :

1) पर्यावरण संवर्धन अधिकारी :

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी. पर्यावरण क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

2) सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन 

संगणक विषयासह वी.ई/बी.टेक/एम.सी.ए. पदवी. प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर ॲडमिनीस्ट्रेशन, नेटवर्कीगमधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. 

3) वैद्यकीय अधीक्षक 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.). महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. शासकीय/निमशासकीय/स्थानिकस्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

4) विधी अधिकारी

मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी. उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान 3 वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक.

5) अग्निशमन केंद्र अधिकारी 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपुर येथुन B.E.Fire Engineering उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-I ही पदवी प्राप्त केलेली असावी. 

6) शाखा अभियंता (स्थापत्य) 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

8) कनिष्ठ अभियंता (पा.पु.)

मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

9) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

10) कर अधीक्षक 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

11) औषध निर्माता (फार्मासिस्ट) 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म. (B.Pharm) पदवी उत्तीर्ण. महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट, 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. संबंधित विषयाच्या कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

12) सहाय्यक कर अधीक्षक 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

13) कर निरीक्षक

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

14) चालक- यंत्रचालक 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.  वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक.

शारीरिक पात्रताः-

 • उंची किमान 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 162 सें.मी.)
 • छाती- साधारण 81 सें.मी. फुगवून-5 सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
 • वजन- किमान 50 कि.ग्रॅ.
 • दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
 • वयोमर्यादाः- उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. 

Age Calculate Website:

15) फायरमन 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.

शारीरिक पात्रताः- या पदास सुद्धा वरील प्रमाणे शारीरिक पात्रता आवश्यक आहे.

16) लिपिक टंकलेखक 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

17) व्हालमन 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

नोट : वरील सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक व  MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद केलेले आहे. 

पदांसाठी वयोमर्यादा किती आहे?

प्रवर्ग

किमान वय

कमाल वय

अराखीव

18 वर्ष

38 वर्ष

मागासवर्गीय

18 वर्ष

43 वर्ष

खेळाडू

18 वर्ष

43 वर्ष

दिव्यांग

18 वर्ष

45 वर्ष

प्रकल्पगस्त

18 वर्ष

45 वर्ष

पदवीधर अंशकालीन उमेदवार

18 वर्ष

55 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट  

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Latur Municipal Corporation Recruitment-2023

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

Age Calculate Website:

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!