पशुसंवर्धन विभाग गट-क संवर्गातील विविध पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध-२०२३


पशुसंवर्धन विभाग गट-क संवर्गातील विविध पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध-२०२३

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि.२६.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक ९.९.२०२३,११.९.२०२३ व १२.९.२०२३ या कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेमध्ये ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांची यादी आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर दि. २३/११/२०२३ रोजी सदरील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदनिहाय संख्या व सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय गुणवत्तेनुसार प्रदर्शीत करण्यात आली आहे. सदर परिक्षेअती प्रारूप निवड यादी संवर्गनिहाय / प्रवर्गनिहाय मुळ अर्हता व पात्रता अभिलेख / कागदपत्रे तपासणीस अधिन राहुन जाहीर करण्यात येत आहे.

सदर निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवाराची अंतिम निवड यादी ही संबंधीत उमेदवाराचे विहीत सेवाप्रवेश नियमानुसार अर्हता व मुळ कागदपत्रे तपासणी अंती त्याचप्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्या नंतरच अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची / खोटी आढळल्यास अगर सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधीत सक्षम प्राधिकारी यांनी अवैध / बाद ठरविल्यास, संबंधीत उमेदवाराचे नाव वरील निवडयादीमधून कमी करण्यात येईल व प्रतिक्षायादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. प्रतिक्षायादी यथावकाश जाहीर करण्यात येईल.

तसेच उपरोक्त प्रारुप निवड यादितील उमेदवारांना वरील नमूद केलेनुसार मूळ कागदपत्रे तपासणी व बायोमॅट्रीक तपासणी करीता उपस्थित राहण्याचे वेळापत्रक लवकरच या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

दिनांक २६/०५/२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिदध केलेल्या जाहीरातीनुसार गट-क संवर्गातील विविध पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराने पदनिहाय यादी डाऊनलोड करून घ्यावी.

* १. बाष्पक परिचर

* २. उच्च श्रेणी लघुलेखक

* ३. निम्न श्रेणी लघुलेखक

* ४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

* ५. पशुधन पर्यवेक्षक

* ६. तारतंत्री

* ७. वरिष्ठ लिपिक

* ८. यांत्रिकी

उमेदवाराने पदनिहाय यादी पाहण्यासाठी किंवा चालू अप्डेड प्राप्त करण्यासाठी https://ahd.maharashtra.gov.in/mr या संकेतस्थळाला भेट द्यावी व योग्य ती खातरजमा करावी. सदरील सूचना या महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या Official संकेतस्थळावरील उक्त माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने