सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-२०२३, विविध पदाच्या २१०९ जागा

Admin
1

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-२०२३, विविध पदाच्या २१०९ जागा


महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराने सदरील सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-२०२३, विविध पदांसाठी अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२३ अशी आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कोणते पदे आहेत?

कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या जागा

PWD पदांची भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी व पुढील पदानुसार दिलेल्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी पुनर्विलोकन करावे.

1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित):

दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.

2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट- ब अराजपत्रित):

दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.

3) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित):

दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्न अर्हता धारण केलेली असावी.

5) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट- ब अराजपत्रित):

दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.

6) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट- ब अराजपत्रित):

दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.

7) उद्यान पर्यवेक्षक (गट-क):

कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी.

8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क):

दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्राची पदवी.

9) स्वच्छता निरीक्षक (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण.

10) वरिष्ठ लिपीक (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर.

11) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण/ विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी.

12) वाहन चालक (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण.

13) स्वच्छक (गट-क):

शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.

14) शिपाई (गट-क):

दहावी परीक्षा उत्तीर्ण.

PWD पदांची भरतीसाठी वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५५ वर्षापर्यंत असावे. (जाहिरात पाहावी)

परीक्षा फी : खुल्या प्रवर्ग : 1000/-, राखीव ९००/- रु

PWD पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अधिकृत वेबसाईट : pwd.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-२०२३, विविध पदाच्या २१०९ जागा ही माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!