तहसीलदार उत्पन्न दाखला- Tahsildar Income Certificate

तहसीलदार उत्पन्न दाखला- Tahsildar Income Certificate

तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (Tahsildar Income Certificate) मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील आवश्यक कागदपत्रे जाणून घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोकरीसाठी, उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी, भारत सरकार व इतर स्कॉलरशीप /शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला काढून घेणे अत्यंत आवश्यक असते.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income Certificate) आवश्यक कागदपत्रे :-

१) रहिवाशी स्वंयघोषणापत्र 

२) उत्पन्नाचा पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला / आयकर विवरण पत्र

३) पत्त्याचा पुरावा रेशनकार्ड झेरॉक्स / लाईट बिल / कर पावती (कोणतेही एक)

४) ओळखीचा पुरावा पॅन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र  (कोणतेही एक)

कालावधी : कार्यालयीन ८ दिवस.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income Certificate) अर्ज कोठे करावा ?

अर्जदाराने वरील कागदपत्रे घेऊन आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र अथवा साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर येथे करता येईल.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income Certificate)  संपर्क ?

साबळे भिवराज मो.नं. 7709582650

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने