RRB Technician Recruitment 2026: रेल्वेमध्ये 6565 तंत्रज्ञ पदांची महाभरती! पात्रता, सिलॅबस आणि अर्जाची माहित

Admin
By -
0
RRB Technician Recruitment 2026
RRB Technician Recruitment 2026 Feature Image

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेमध्ये ६,५६५ तंत्रज्ञ पदांची महाभरती! जाणून घ्या पात्रता, सिलॅबस आणि अर्जाची संपूर्ण माहिती

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (Railway Recruitment Board - RRB) तंत्रज्ञ म्हणजेच Technician पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत संक्षिप्त अधिसूचना (CEN No. 02/2026) प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत देशभरात एकूण ६,५६५ जागा भरल्या जाणार आहेत.

जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल, किंवा तुम्ही Diploma/Degree धारक असाल, तर ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

RRB Technician Recruitment 2026 Overview (थोडक्यात माहिती)

वैशिष्ट्ये (Features) तपशील (Details)
भरती संस्था (Organization) रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board - RRB)
जाहिरात क्रमांक (Advt No.) CEN No. 02/2026
पदाचे नाव (Post Name) तंत्रज्ञ (Technician Grade I & Grade III)
एकून जागा (Total Vacancies) ६,५६५ पदे
अर्ज करण्याची पद्धत (Apply Mode) ऑनलाईन (Online)
Advertizment ऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईट (Official Website) rrbapply.gov.in

पदांचा तपशील आणि संख्या (Vacancy Details)

या मेगाभरती अंतर्गत रेल्वे प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उमेदवारांची निवड करणार आहे:

  • १. टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल (Technician Grade I Signal): ३२३ जागा
  • २. टेक्निशियन ग्रेड-३ (Technician Grade III): ६,२४२ जागा

एकूण रिक्त पदे: ६,५६५ जागा

महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी RRB Mumbai (मुंबई) आणि RRB Nagpur (नागपूर) या झोन अंतर्गत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

उमेदवारांनी अर्ज भरताना वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. रेल्वेने जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध होणे (Detailed Notification): २९ जून २०२क्षा
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख (Online Application Start Date): ३० जून २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply): २९ जुलै २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
  • परीक्षा तारीख (CBT Exam Date): लवकरच घोषित केली जाईल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

दोन्ही ग्रेडसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, जी खालीलप्रमाणे आहे:

१. टेक्निशियन ग्रेड-१ (सिग्नल)

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation) उत्तीर्ण असावा. किंवा
  • संबंधित विषयात ३ वर्षांचा Engineering Diploma किंवा B.E / B.Tech पदवी धारण केलेली असावी.

२. टेक्निशियन ग्रेड-३

  • उमेदवार १० वी उत्तीर्ण (Matriculation/SSLC) असावा + संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ट्रेड्स: Fitter, Welder, Electrician, Machinist, Turner, Carpenter इ.) किंवा
  • उमेदवाराने रेल्वे संस्थेमधून Act Apprenticeship पूर्ण केलेली असावी.

टीप: काही विशिष्ट पदांसाठी (उदा. S&T - Signal & Telecommunication) १२ वी उत्तीर्ण (Physics आणि Mathematics सह - PCM) असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा (Age Limit - As on 01/07/2026)

या भरतीसाठी उमेदवाराचे वय १ जुलै २०२६ रोजी खालीलप्रमाणे असावे (यामध्ये कोविड मुळे ३ वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे):

  • Technician Grade I (Signal): १८ ते ३३ वर्षे
  • Technician Grade III: १८ ते ३० वर्षे

वयोमर्यादेत सवलत (Age Relaxation):

  • OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे सूट
  • SC / ST: ५ वर्षे सूट
  • PwBD (दिव्यांग): १० वर्षे सूट

परीक्षा शुल्क (Application Fee)

  • General / OBC / EWS: ₹५००/- (CBT परीक्षा दिल्यानंतर ₹४००/- बँक खात्यात रिफंड मिळतात).
  • SC / ST / Ex-Serviceman / महिला / दिव्यांग / EBC: ₹२५०/- (CBT परीक्षा दिल्यानंतर ₹२५०/- पूर्ण रिफंड मिळतात).

निवड प्रक्रिया (Selection Process)

या भरती प्रक्रियेत सर्वात मोठा बदल म्हणजे गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड जलद गतीने करण्यासाठी प्रक्रिया सोपी केली आहे .

  1. १. संगणकावर आधारित चाचणी (Computer Based Test - CBT): यावर्षी केवळ एकच CBT परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.
  2. २. कागदपत्र पडताळणी (Document Verification - DV)
  3. ३. वैद्यकीय तपासणी (Medical Examination): रेल्वेच्या नियमांनुसार (A-3, B-1, B-2 वैद्यकीय मानके) शारीरिक व दृष्टी चाचणी घेतली जाईल.

परीक्षा पद्धत आणि सिलॅबस (Exam Pattern)

Grade I (Signal) पॅटर्न: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे. यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, कॉम्प्युटर बेसिक, गणित आणि बेसिक सायन्स व इंजिनिअरिंग या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

Grade III पॅटर्न: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे. यामध्ये विषयांचे गुणविभागणी खालीलप्रमाणे असेल:

  • गणित (Mathematics) - २५ प्रश्न
  • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) - २५ प्रश्न
  • सामान्य विज्ञान (General Science) - ४० प्रश्न
  • चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान (General Awareness) - १० प्रश्न
महत्त्वाची सूचना (Negative Marking): या परीक्षेत १/३ (One-Third) निगेटिव्ह मार्किंग असेल. म्हणजेच प्रत्येक ३ चुकीच्या उत्तरांमागे १ गुण वजा केला जाईल.

वेतन श्रेणी आणि पगार (Salary Details)

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) आकर्षक पगार आणि इतर भत्ते (DA, HRA, Transport Allowance) मिळतात.

  • Technician Grade I (Signal): पे-लेव्हल ५ (Pay Level 5) नुसार मूळ वेतन ₹२९,२००/- असते. सर्व भत्ते मिळून सुरुवातीचा इन-हँड पगार जवळपास ₹४५,०००+ च्या घरात जातो.
  • Technician Grade III: पे-लेव्हल २ (Pay Level 2) नुसार मूळ वेतन ₹१९,९००/- असते. सर्व भत्ते मिळून सुरुवातीचा इन-हँड पगार जवळपास ₹३२,०००+ च्या घरात जातो.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या प्रायमरी स्टेप
रेल्वे भर्ती बोर्डाच्या rrbapply.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
2. नवीन नोंदणी करा (Registration) आधार वेरिफिकेशनसह
'Create an Account' वर क्लिक करून आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका. Aadhaar Verification प्रक्रिया पूर्ण करा जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत.
3. झोन आणि पदाची निवड करा CEN 02/2026
लॉगिन करून 'CEN 02/2026 (Technician)' निवडा आणि तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य तो रेल्वे झोन (उदा. RRB Mumbai) निवडा.
4. माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा १० वी प्रमाणपत्रानुसार
आपली शैक्षणिक व वैयक्तिक माहिती अचूक भरा. त्यानंतर स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक जातीचे प्रमाणपत्र अपलोड करा.
5. परीक्षा शुल्क भरा आणि print काढा अंतिम स्टेप
Net Banking, Credit/Debit Card किंवा UPI द्वारे On-line फी भरा. फॉर्म सबमिट करून अंतिम अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

निष्कर्ष आणि यशाची टीप (Conclusion & Preparation Tip)

रेल्वेमधील ६,५६५ जागांची ही भरती ITI आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन आली आहे. यामध्ये General Science (सामान्य विज्ञान) या विषयाला सर्वाधिक ४0 गुण असल्यामुळे, उमेदवारांनी NCERT किंवा राज्य बोर्डाच्या ८ वी ते १० वी च्या विज्ञान पुस्तकांचा सखोल अभ्यास करावा. ३० जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्याने आपले आवश्यक कागदपत्रे (उदा. कास्ट सर्टिफिकेट, नॉन-क्रिमिलेअर) आत्ताच तयार ठेवा.

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!