पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ४०७ शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) तात्पुरत्या स्वरूपात एक वर्षासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र आय.टी.आय. (ITI) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
📊 पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| अ.क्र. | व्यवसायाचे नाव (Trade) | एकूण पदे |
|---|---|---|
| १ | कोपा (COPA) | १०६ |
| २ | तारतंत्री (Wireman) | ८७ |
| ३ | वीजतंत्री (Electrician) | ८० |
| ४ | डेस्कटॉप ऑपरेटींग (DTPO) | ४२ |
| ५ | नळ कारागीर (Plumber) | २४ |
| इतर सर्व पदे (RACT, POCM, Surveyor, इ.) | ६८ | |
| एकूण जागा | ४०७ | |
✅ महत्वाच्या अटी आणि पात्रता
- शैक्षणिक पात्रता: ITI परीक्षा सन २०२३, २०२४ किंवा २०२५ मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक.
- प्राधान्य: कोपा (COPA) पदासाठी मराठी/इंग्रजी टंकलेखन असल्यास प्राधान्य.
- बँक खाते: आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeding) असणे अनिवार्य.
- कालावधी: केवळ १ वर्षाचे प्रशिक्षण.
📅 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू: २७ एप्रिल २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ मे २०२६
कागदपत्रे जमा करण्याची मुदत: ०८ मे २०२६ पर्यंत
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया
१. NAPS पोर्टलवर नोंदणी: सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in वर प्रोफाइल १००% अपडेट करून अर्ज करा.
२. कागदपत्रे जमा करणे: अर्जाची प्रत मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागात समक्ष जमा करा.

Please Like, Comment & Share