आरोग्य भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

Admin
0

आरोग्य भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक २९.८.२०२३ रोजी पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक
१८.९.२०२३ रोजी २३.५५ वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ.क्र

तपशील

विहीत कालावधी

अर्ज सादर करण्याचा कालावधी

दि. १९.९.२०२३ रोजी रात्री ००.०५ पासून

दि. २२.९.२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत

ऑनलाईन पध्दतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक

दि. २२.९.२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यत

यापुर्वी दिनांक २९.८.२०२३ ते दिनांक १८.९.२०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच वरीलप्रमाणे मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी मुदतवाढीचे जाहीर प्रगटन पहा.

दि. १८.९.२०२३ रोजी आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्रानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारखी दि. २२.९.२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत आहे. उर्वरित उमेदवारांनी मुदतीत फॉर्म भरून घ्यावा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!