मोठी संधी! दक्षिण-पश्चिम रेल्वेत तब्बल ९०४ जागांसाठी भरती! आजच अर्ज करा!

📢 मोठी संधी! दक्षिण-पश्चिम रेल्वेत तब्बल ९०४ जागांसाठी भरती! आजच अर्ज करा! 🚂💰

मोठी संधी! दक्षिण-पश्चिम रेल्वेत तब्बल ९०४ जागांसाठी भरती! आजच अर्ज करा!

भारतीय रेल्वेच्या दक्षिण- पश्चिम विभागात शिकाऊ पदांच्या एकूण ९०४ जागांसाठी भरती होत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आयटीआय पास व प्रशिक्षणार्थी यांना खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

या भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना 'rrchubli.in' या दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर १६ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महत्वाचे तपशील:

 * पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (आयटीआय अप्रेंटिस)

 * पदांची संख्या: ९०४

 * अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 * अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५

 * विभागांनुसार रिक्त जागा:

  * हुबळी विभाग: २३७

  * कॅरेज रिपेअर वर्कशॉप, हुबळी: २१७

  * बेंगळूरु विभाग: २३०

  * मैसूर विभाग: १७७

  * सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर: ४३

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (https://rrchubli.in/) वरील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तिथे तुम्हाला प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती मिळेल.

अर्ज शुल्क:

 * सामान्य/ओबीसी उमेदवार: रु. १००/-

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृपया दक्षिण- पश्चिम रेल्वेची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

ऑनलाइन अर्ज भरण्यास संपर्क 

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने